Homeताज्या बातम्याबीड

महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय धोंडे; व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप बिनविरोध

महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय दादा धोंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाच

आष्टी येथे ’पाटील फार्मा एजन्सीज’चे उद्घाटनआ.सुरेश धस,माजी आ.साहेबराव दरेकर, भिमराव धोंडे, सतिश शिंदे, आदींनाथ महाराज दानवे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
तर्कशक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगमह.भ.प. राजू महाराज लोखंडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवपद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने व अभिनेत्री मेघना झुझम यांच्या हस्ते सन्मान
शाँर्ट सर्किटमुळे केसर आंब्याची बाग जळुन खाकआष्टी तालुक्यातील बीड सांगवी – गणगेवाडी येथील घटना; शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान



महेश सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. अजय दादा धोंडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी दादासाहेब जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडीनंतर संचालक मंडळ, सभासद आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.
ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर, प्रादेशिक उपसंचालक साखर, छत्रपती संभाजीनगर तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळकृष्ण शिंदे, सहायक निबंधक अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. निवडीनंतर विविध मान्यवरांनी डॉ. अजय धोंडे आणि दादासाहेब जगताप यांचे अभिनंदन करून आगामी काळात कारखान्याच्या प्रगतीसाठी सक्षम नेतृत्व मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी आमदार भीमरावजी धोंडे म्हणाले, महेश सहकारी साखर कारखाना हा शेतकर्‍यांचा विश्वासाचा कारखाना आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे हित जपत कारखान्याची आर्थिक घडी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारखान्याला नव्या उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. संचालक मंडळातील सर्व सदस्य अनुभवी असून त्यांच्या सहकार्यामुळे कारखान्याची प्रगती अधिक वेगाने होईल. नवनिर्वाचित चेअरमन डॉ. अजय दादा धोंडे यांनी सभासद, संचालक मंडळ आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत सांगितले की, माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केले जाईल. कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित संचालक मंडळ
मा. आ. भीमरावजी धोंडे, नियामत बेग, संभाजी महादेव जगताप, सतीश रभाजी झगडे, अ‍ॅड. रत्नदीप भिमराव निकाळजे, गणेश मारुतीराव सांगळे, केशव मच्छिंद्र शिंदे, झुंबर मारुती चव्हाण, बजरंग कोंडीबा कर्डिले, गजानन पांडुरंग गावडे, शहादेव महादेव गर्जे, उद्धव आनंदराव विधाते, अशोक विष्णू खेडकर, तुकाराम रामू मोहोळकर, अंकुश चिंतामण मुंडे, कांती संतोष गोल्हार, उज्वला संजय नन्नवरे, बाबासाहेब गोरख वाघुले, सदाशिव केरू दिंडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी थोरवे यांनी केले तर आभार प्रदर्शन नियामत बेग यांनी मानले.  यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश झगडे, चीफ अकाउंटंट सुरेश बोराटे, सोपानराव मुळे, सुरक्षा अधिकारी नवनाथ भगत, मुख्य शेतकी अधिकारी वीरेंद्र गर्जे, सिव्हिल इंजिनिअर रवी भोजने, माजी संचालक पांडुरंग गावडे, चीफ केमिस्ट के. डी. गर्जे तसेच सभासद, शेतकरी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS