कर्जत : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्याचे सुपुत्र किरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल, कर्जत

कर्जत : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी कर्जत तालुक्याचे सुपुत्र किरण पाटील यांची निवड झाल्याबद्दल, कर्जत येथे विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. तात्यासाहेब ढेरे यांनी प्रास्ताविक करून किरण पाटील यांच्या राजकीय, सामाजिक व संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी ज्येष्ठ नेते कैलास शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, बाळासाहेब साळुंखे, ज्ञानदेव वाफारे, शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख बापूसाहेब नेटके (मेजर) आणि माजी उपायुक्त नागेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या छोट्याशा गावातून काँग्रेस पक्षाचे बाळकडू घेतलेले आणि पक्षाशी नेहमी निष्ठावंत राहिलेले नेतृत्व म्हणून किरण पाटील यांची ओळख आहे. उपसभापती पदासह विविध पदांवर काम करण्याचा दांडगा अनुभव असणारे किरण पाटील जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना किरण पाटील यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला.
या कार्यक्रमास बापूसाहेब काळदाते, संतोष बापू भोसले, मुबारकभाई मोगल, किशोर तापकीर, सुभाष तनपुरे, रावसाहेब धांडे, बंटी यादव, वसंत कांबळे, महेश जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजकांनी केले तर अमोल पाटील यांनी आभार मानले.

COMMENTS