Homeताज्या बातम्या

स्व. निर्मला काकडे स्मारक समितीची सहविचार सभा उत्साहात; चरित्रग्रंथ आणि पुतळा उभारण्याचा निर्णय

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगावच्या संस्थापक मुख्याध्यापिका स्व. निर्मलाताई काकडे यांच्या स्मृती जतन व संवर्धनासाठी स्थापन करण्य

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयाच्या तिघांना नोकरी; दोन विद्यार्थिनींची पोलीस तर एकाची सैन्य दलात निवड
उष्णतेचा मोठा फटका; कर्जत तालुक्यात लाखो रुपयांचा कांदा सडला!
बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती

भातकुडगाव फाटा : आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगावच्या संस्थापक मुख्याध्यापिका स्व. निर्मलाताई काकडे यांच्या स्मृती जतन व संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्व. निर्मलाताई काकडे स्मारक समितीची सहविचार सभा राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली.

सभेच्या प्रारंभी अमरावती येथे होणाऱ्या चौथ्या ‘स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महत्त्वपूर्ण निर्णय आणि आवाहन:

  • पुतळा व चरित्रग्रंथ: स्व. निर्मलाताई काकडे यांच्या स्मरणार्थ भव्य पुतळा उभारणे, त्यांच्या जीवनावर आधारित चरित्रग्रंथ प्रकाशित करणे आणि चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
  • साहित्याचे संकलन: त्यांच्या जीवनकार्याशी संबंधित लेख, आठवणी, अनुभव, संस्मरणे व दुर्मिळ छायाचित्रे जून २०२६ अखेरपर्यंत स्मारक समितीकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सभेस डॉ. पुरुषोत्तम भापकर, कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख ॲड. डॉ. विद्याधर काकडे, हर्षदा काकडे, ॲड. सुभाष भोर, प्रा. रामराजे लाखे, हेमलता लाखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS