कोपरगाव : कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे शिक्षण संस्थेच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची स

कोपरगाव : कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे शिक्षण संस्थेच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची सैन्य दल व पोलीस दलात निवड झाली आहे. यामध्ये दोन विद्यार्थिनींचा समावेश असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे, अशी माहिती प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली.
महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा व शारीरिक चाचणीसाठी सातत्याने मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. या मार्गदर्शनाचा लाभ घेत रमेश घोडेराव याने देशसेवेचे स्वप्न साकार करत भारतीय सैन्य दलात (Indian Army) स्थान मिळविले आहे.
तसेच, महाविद्यालयाची विद्यार्थिनी वृषाली वाघ हिची नागपूर ग्रामीण पोलीस दलात, तर आरती कलोर हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड आणि प्रभारी प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS