Homeताज्या बातम्या

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

नांदेड: हणेगाव परिसरात कोणताही वारा किंवा पाऊस नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसातून अनेक

महाराष्ट्राला ‘एआय’मध्ये देशात अव्वल स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची घोषणा, ‘टेक थर्सडे’ उपक्रमाचा प्रारंभ
तामसा परिसरात गुटखा विक्रीचा सुळसुळाट; बंदी केवळ कागदावर?
खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!
Nanded News महावितरणचा मनमानी कारभार? थकबाकीच्या कारणावरून दावणगीर संपूर्ण  गाव अंधारात

नांदेड: हणेगाव परिसरात कोणताही वारा किंवा पाऊस नसतानाही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दिवसातून अनेक वेळा वीज ये-जा होत असून, रात्रीच्या वेळी कोणतीही पूर्वसूचना न देता तीन ते चार तास वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

सततच्या वीजखंडितीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीज बिल भरण्यास विलंब झाल्यास महावितरणकडून तत्काळ वीज तोडण्याची कारवाई केली जाते. मात्र, वारंवार होणार्‍या वीजखंडितीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण दिले जात नसल्याने महावितरणच्या स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हणेगावकरांनी संबंधित अधिकार्‍यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नात हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविण्यात आली नाही तर नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

COMMENTS