Homeताज्या बातम्यासंपादकीय

चीनचा घुसखोरीचा डाव

भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून नेहमीच पाकिस्तान आणि चीन या दोन देशांचा उल्लेख करण्यात येतो. त्यामागचे कारण म्हणजे दोन्ही देश विश्‍वासार्ह नसल्याचे

अमली पदार्थ आणि महाराष्ट्र
रुपयाची अस्थिरता…
काँगे्रसमधील गोंधळ

भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून नेहमीच पाकिस्तान आणि चीन या दोन देशांचा उल्लेख करण्यात येतो. त्यामागचे कारण म्हणजे दोन्ही देश विश्‍वासार्ह नसल्याचे अनेकवेळेस सिद्ध झाले आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये उपद्रवी राष्ट्र म्हणून या देशांचा उल्लेख करावा लागेल. जर आपल्या शेजारील राष्ट्रांनी सीमारेषेवर कोणत्याही कुरापाती न करता आणि पाकिस्तानने जर दहशतवादी कारवाया थांबवल्या या आशिया खंडातील या तिन्ही देशांचा वेगाने विकास होऊ शकतो. कारण तिन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा मोठा खर्च संरक्षण व्यवस्थेवर होतो. आपल्या शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये नेहमीच युद्धाची खुमखुमी दिसून येते. त्यामुळे भारताला देशील शस्त्रास्त्र संपन्न म्हणून सज्ज राहावे लागते. शस्त्रास्त्रावर होणारा खर्च जर इतर विकासकामांमध्ये खर्च केला, तर जगातील अनेक देशांना आपण विकासाच्या बाबतीत मागे टाकू शकतो. मात्र शेजारी राष्ट्रावर विसंबून राहता येत नाही, याचा प्रत्यय आपण 1962 आणि 1965 मध्ये घेतला आहे. काल सोमवारी देखील चीनने भारतीय सीमारेषेच्या अंतर्गत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.  अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहा भारतीय जवान जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्यावर गुवाहाटीमधील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास 300 ते 400 चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैन्यातही अनेकजण जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली. तवांगमधील प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडण्यासाठी चीनने आधीच पूर्ण तयारी केली होती. एका संधीच्या शोधात चीनी सैन्य असल्याचे आता समोर आले आहे. दोन्ही देशांदरम्यान 3000 किमीची प्रत्यक्ष ताबा रेषा आहे.  9-10 डिसेंबरच्या मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास तवांग पूर्व येथे  भारत-चीनच्या सैन्यात संघर्ष झाला. ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या ठिकाणी घनदाट जंगल आहे. चीन आपल्या बाजूने पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी या भागात बर्फवृष्टी झाली. त्याशिवाय, ढग दाटून आले होते. त्यामुळे भारतीय सॅटेलाइट्सला चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यास अडथळे येत होते. त्याचाच फायदा घेत चीनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
वास्तविक पाहता चीनची ही घुसखोरी भारतासाठी नवी नाही. 15 वर्षाची आकडेवारी पाहिली तर, चीनने दरवर्षी किमान सरासरी आठ वेळर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि भारताने हा प्रयत्न नेहमीच हाणून पाडला आहे. भारत आणि चीन यांच्यात 3488 किमीची सीमा आहे. जी ब्रिटिशांची सत्ता असतांना तयार करण्यात आली होती. मात्र चीन ही सीमा मानायला तयार नाही. अनेक वेळेस वादाचे मुद्दे काढून चीन सीमासंघर्ष उकरून काढण्याचा जसा प्रयत्न करतो, तसाच तो घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. चीनच्या मते अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग आहे. भारताने मात्र हा दावा खारिज केला आहे. लडाखमध्ये अक्साई चीनचा एक मोठा भाग आहे. तो सध्या चीनच्या नियंत्रणात आहे. मात्र भारत त्याला आपला भाग मानतो. यावरुन अनेक वेळेस संघर्ष उडतांना दिसून येत आहे. एकीकडे चीन तर दुसरीकडे पाकिस्तान दोन्ही देश भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतांना दिसून येतात. मात्र भारताने नेहमीच या दोन्ही देशांना आपली ताकद दाखवून दिली आहे.

COMMENTS