Homeताज्या बातम्या

हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार

नांदेड: भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तरच्या वतीने हदगाव-हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांची (बीएलए-२) महत्त्वपूर्ण बैठक शनि

पल्स पोलिओ मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद; महानगरपालिकेच्या २८ केंद्रांवर लसीकरण, रेल्वे स्थानकावरही डोस
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप
Maharashtra : मतदानासाठी 'या' तारखेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य, स्थानिक  स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश | Election  Commission ...

नांदेड: भारतीय जनता पार्टी, नांदेड उत्तरच्या वतीने हदगाव-हिमायतनगर विधानसभा क्षेत्रातील बूथस्तरीय कार्यकर्त्यांची (बीएलए-२) महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजता हदगाव येथील मधुबन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस प्रदेश महामंत्री सुनील राणे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्यबापू देशमुख, जिल्हा प्रभारी किरण पाटील तसेच जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बैठकीस हदगाव विधानसभा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, मंडळ सरचिटणीस, मतदार यादी प्रमुख (बीएलए-१), बूथस्तरीय कार्यकर्ते (बीएलए-२) तसेच ‘मन की बात’ मंडळ प्रमुख यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विशेषतः बूथस्तरीय कार्यकर्त्यांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, मतदार संपर्क, बूथ व्यवस्थापन आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती भाजपा हदगाव-हिमायतनगर विधानसभा पदाधिकार्‍यांनी दिली आहे.

COMMENTS