Homeताज्या बातम्या

उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन; आझाद मैदानावर ढोर-कक्कया समाजाचे शक्तीप्रदर्शन

नांदेड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात दि. ३० जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चा

खा. नागेश पाटील यांचा ताफा अडवल्याप्रकरणी बबनराव बारसे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा
पालघर, वसई-विरारमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, साचलेल्या पाण्यात कार घुसून अपघात
औरंगपूर दरोड्यातील फरार आरोपी जेरबंद; ‘एलसीबी’ची धडक कारवाई, पाडळी रांजणगाव येथून अटक
आज फिर DC दफ्तर के सामने पटवार यूनियन का धरना प्रदर्शन - patwar union  protest in front of dc office-mobile

नांदेड: अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात दि. ३० जून रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात ढोर-कक्कया समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे प्रदेश महासचिव नामदेव सदाशिवराव फुलपगार यांनी केले आहे.

अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणात कोणतेही उपवर्गीकरण करू नये, अशी समाजाची ठाम भूमिका असून, यामुळे सामाजिक एकात्मतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबविणे, न्यायमूर्ती अनंत बद्दर समितीचा अहवाल जाहीर करणे आणि आरक्षणाशी कोणतीही छेडछाड न करणे या प्रमुख मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे. या आंदोलनात नांदेडसह राज्यभरातील विविध सामाजिक संघटना, युवक, महिला आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे फुलपगार यांनी सांगितले.

COMMENTS