Homeताज्या बातम्या

एसटीचे सवलत स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची ससेहोलपट; अकोलेत शिबिरे आयोजित करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

अकोले: अकोले तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सवलत प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांच्या स्मार्ट कार्ड नोंदणी व वि

महावितरणच्या कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; ‘सहाय्यक अभियंता’ पद रिक्त; वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विश्वास नांगरे पाटलांचे समर्थन; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंच्या विमान प्रवासावरही दिली प्रतिक्रिया
दहावी उत्तीर्ण दानिश अनीस सय्यद याचे हार्दिक अभिनंदन; बीडमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्या शुभेच्छा

अकोले: अकोले तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या सवलत प्रवासासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांच्या स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीने केली असून, तालुक्यात ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करून ही प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे.

स्मार्ट कार्डसाठी नागरिकांना दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून अनेकांना क्रमांकच मिळत नसल्याने त्यांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अकोले हा आदिवासी तालुका असून अनेक गावे बसस्थानकापासून ४० ते ८० किलोमीटर अंतरावर आहेत, तरीही सध्या केवळ बसस्थानक परिसरातच एक सुविधा केंद्र असल्याने येथे प्रचंड गर्दी होत आहे.

कोतूळ, समशेरपूर, गणोरे, राजूर, शेंडी (भंडारदरा), मवेशी, कळस आदी ग्रामीण भागातही कार्ड वितरणाची सेवा उपलब्ध करून देऊन गावागावांत शिबिरे घ्यावीत, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. तसेच नवीन कार्डसाठी १९९ रुपये आणि जुन्या कार्डधारकांसाठी १४९ रुपये असे शुल्क निश्चित असताना जादा आकारणी होऊ नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. कार्ड काढण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ अशी फलकावर स्पष्ट दर्शवावी आणि नवीन कार्ड काढण्याची मुदत ४ ते ६ महिने वाढवावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

याबाबतचे निवेदन परिवहन मंत्री, राज्यमंत्री, परिवहन आयुक्त, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि स्थानिक आगार व्यवस्थापकांना पाठविण्यात आले आहे.

COMMENTS