Homeताज्या बातम्या

आरोग्याची खेळ करणार्यांना अभय नकोभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मनसेचे सोमेश्वर कदम यांची मागणी

बीड शहर व जिल्ह्यात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या

बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
नांदेडमधील हॉटेलांची अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी करा; नागरिकांकडून वाढती मागणी
तुकाराम मुंढेंच्या भेसळविरोधी मोहिमेस ग्राहक पंचायतीचा पाठिंबा  



बीड शहर व जिल्ह्यात भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव सोमेश्वर राजकुमार कदम यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन विविध खाद्यपदार्थ उत्पादक व विक्रेत्यांची संयुक्त तपासणी करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात मोंढा येथील तेलविक्रेते किराणा दुकानदार, बेकरी, स्वीट होम, दूध डेअरी, लस्सी व आइसक्रिम विक्रेते, हॉटेल्स, चायनीज गाडे, फरसाण दुकाने, पेढा, सोनपापडी व चिक्की उत्पादक, पावभाजी सेंटर, धाबे, फळ विक्रेते तसेच रसायनांचा वापर करून पिकवलेले आंबे व इतर फळांची विक्री करणारे व्यापारी आणि पॅकेज्ड पिण्याचे पाणी (जार प्लांट) उत्पादक यांची तात्काळ संयुक्त तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाचे अन्न विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. संघटित पद्धतीने भेसळ करणार्या टोळ्यांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणार्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव सोमेश्वर राजकुमार कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.

COMMENTS