Homeताज्या बातम्या

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी ढोरमले; जातेगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान

निघोज: पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वि

दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश
महिला भाविकाची हरवलेली पर्स प्रामाणिकपणे परत
शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन

निघोज: पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी जातेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष सुदाम ढोरमले यांची नुकतीच निवड करण्यात आली. देवस्थानच्या अध्यक्षा सुनीता पोटघन यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बोरुडे, माजी सभापती गणेश शेळके, सचिव सचिन ढोरमले, विश्वस्त दत्तात्रय ढोरमले, माजी सरपंच विठ्ठल पोटघन, दिगंबर पोटघन, विजय जगताप, सोनाली ढोरमले, निलेश पोटघन, विजय जऱ्हाड, बाळासाहेब कळमकर, बाळासाहेब फटांगडे, उत्तम पोटघन, प्रभू गायकवाड गुरुजी, दादाभाऊ वारे, राजाराम शिंदे, अमोल सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर भावना व्यक्त करताना नवनियुक्त विश्वस्त संतोष ढोरमले म्हणाले, “देवस्थानचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांनी माझ्यावर विश्वास दाखवून श्री काळभैरवनाथांची सेवा करण्याची संधी दिली आहे. या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून देवस्थानच्या विकासासाठी कार्य करणार असून सर्वांचा मी ऋणी आहे.”

श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट हे राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता प्राप्त असून निसर्गरम्य परिसरात वसलेले हे देवस्थान भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. येथे दर रविवारी भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. तसेच मंदिर परिसरात विविध विकासकामेही सध्या सुरू आहेत.

संतोष ढोरमले यांच्या निवडीबद्दल माजी खासदार सुजय विखे, आमदार काशिनाथ दाते, भाजप पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, श्री काळभैरवनाथ देवस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन बढे, अनिल पोटघन यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS