Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावातील दूध डेअरीवरील कारवाईनंतर गोंधळ

शेवगाव : मंगळवार दि. ७ रोजी सायंकाळी शेवगाव शहरातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत अन्न भेसळ विभागाच्या अपर्णा भोईटे व अन्नपुरवठा अधिकारी प्रदीप पवार सहभागी होते. कारवाईदरम्यान संबंधित डेअरीतून दूधाचे नमुने घेण्यात आले होते. व ते तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली होती. छाप्यानंतर प्रदीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमुन्यांचा अहवाल एक महिन्याच्या कालावधीत येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन -तीन दिवसांत नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदीप पवार आणि अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित डेअरीमध्ये भेसळीचा कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नसल्याचे सांगितले. व हि नियमित तपासणी असल्याचे सांगितले. त्यामुळे शेवगावमध्ये या प्रकरणाबाबत मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शेवगाव येथील मूळ कारवाईत सहभागी नसलेल्या राजेश बडे यांनी घाईघाईने संबंधित डेअरीला ‘क्लीन चिट’ देण्यासारखे वक्तव्य केल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकारी अपर्णा भोईटे उपस्थित असताना अशी भूमिका का घेतली गेली, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे. यामुळे अन्न भेसळ विभाग आणि तथाकथित दूध माफिया यांच्यात संगनमत असल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या. या संदर्भात अपर्णा भोईटे व प्रदीप पवार यांना विचारले असता, “प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येणे बाकी असून सध्या कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राजेश बडे यांनी दिलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पत्रकार परिषदेत बडेंसोबत उपस्थितीमुळे पवार यांच्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी, या कारवाईतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या अस्मितेशी खेळ? ५० ते ६० हजार लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर अशा प्रकारे संभ्रम निर्माण होणे धोकादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून काही सामाजिक संघटना यासाठी पुढाकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध भेसळ प्रकरणांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेले असतानाही अधिकाऱ्यांकडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संशयित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी माहिती अधिकार महासंघ, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेंद्र जायभाये यांनी सांगितले की, “या प्रकरणात लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अँटी करप्शन विभाग व मुख्यमंत्री सचिवालयाकडे निवेदन देण्यात येणार आहे. अन्न भेसळ विभागातील काही अधिकाऱ्यांचे दूध माफियांसोबत आर्थिक संबंध असल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी व्हावी.” तसेच, संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त
मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव

शेवगाव : मंगळवार दि. ७ रोजी सायंकाळी शेवगाव शहरातील एका दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत अन्न भेसळ विभागाच्या अपर्णा भोईटे व अन्नपुरवठा अधिकारी प्रदीप पवार सहभागी होते. कारवाईदरम्यान संबंधित डेअरीतून दूधाचे नमुने घेण्यात आले होते. व ते तपासण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली होती.

छाप्यानंतर प्रदीप पवार यांनी माध्यमांशी बोलताना नमुन्यांचा अहवाल एक महिन्याच्या कालावधीत येईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन -तीन दिवसांत नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रदीप पवार आणि अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संबंधित डेअरीमध्ये भेसळीचा कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नसल्याचे सांगितले. व हि नियमित तपासणी असल्याचे सांगितले. त्यामुळे शेवगावमध्ये या प्रकरणाबाबत मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, शेवगाव येथील मूळ कारवाईत सहभागी नसलेल्या राजेश बडे यांनी घाईघाईने संबंधित डेअरीला ‘क्लीन चिट’ देण्यासारखे वक्तव्य केल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकारी अपर्णा भोईटे उपस्थित असताना अशी भूमिका का घेतली गेली, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे. यामुळे अन्न भेसळ विभाग आणि तथाकथित दूध माफिया यांच्यात संगनमत असल्याच्या चर्चा शनिवारी दिवसभर रंगल्या.

या संदर्भात अपर्णा भोईटे व प्रदीप पवार यांना विचारले असता, “प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येणे बाकी असून सध्या कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य नाही. राजेश बडे यांनी दिलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पत्रकार परिषदेत बडेंसोबत उपस्थितीमुळे पवार यांच्याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी, या कारवाईतील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या अस्मितेशी खेळ?

५० ते ६० हजार लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नावर अशा प्रकारे संभ्रम निर्माण होणे धोकादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून काही सामाजिक संघटना यासाठी पुढाकार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध भेसळ प्रकरणांवर कठोर कारवाईचे निर्देश दिलेले असतानाही अधिकाऱ्यांकडून परस्परविरोधी माहिती दिली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणात पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संशयित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

माहिती अधिकार महासंघ, अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेंद्र जायभाये यांनी सांगितले की, “या प्रकरणात लवकरच पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अँटी करप्शन विभाग व मुख्यमंत्री सचिवालयाकडे निवेदन देण्यात येणार आहे. अन्न भेसळ विभागातील काही अधिकाऱ्यांचे दूध माफियांसोबत आर्थिक संबंध असल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी व्हावी.” तसेच, संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS