Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी निवडणुका शिंदे गट पूर्ण ताकदीने लढणार : संजय मरकड

पाथर्डी : आगामी काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने लढणार असून गाव तेथे शाखा सुरु करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. मरकड यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल गवळी,सदाशिव मरकड,ज्ञानेश्वर मरकड,भाऊसाहेब निमसे,शरद कुटे,बाबासाहेब कुटे,रमेश मरकड हे उपस्थित होते.           पुढे बोलताना मरकड म्हणाले की, आपण कट्टर भाजप प्रेमी असलो तरीही सध्याची तालुक्यातील भाजप ही राजळे जनता पार्टी झाल्याने आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.मी भाजप मध्ये असताना जी हिंदुत्वाला पूरक अशी भूमिका घेतली होती त्याचे कौतुक  मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे  यांनी केले होते. येणाऱ्या ७९ ग्रामपंचायत निवडणूका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असून तिसगाव गटातून मी स्वतः उमेदवारी करणार आहे.                                                                                                                                        माझी निवड ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे,राम रेपाळे व राजळे यांना धोबीपछाड देणाऱ्या अरुण मुंडे यांनी केली असून मी त्यांचा आभारी आहे.आगामी निवडणुका लढवु इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधावा.                                                                        पाथर्डी शहरात लवकरच पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. जनतेची सर्व प्रश्ने आम्ही सोडवणार असून अगोदर हात जोडून कामे झाली तर ठीक अन्यथा हात सैल सोडून सुद्धा कशी कामे करायची ते आम्हाला माहित आहे.हिंदुत्वाला मानणारी सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही पक्षधर्म म्हणून भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ते म्हणाले.

सुशीलामाई काळे महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन
पिंपळदरी आश्रम शाळेला सोलर वॉटर प्युरिफायर भेट
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन : संधान

पाथर्डी : आगामी काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने लढणार असून गाव तेथे शाखा सुरु करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. मरकड यांची शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल गवळी,सदाशिव मरकड,ज्ञानेश्वर मरकड,भाऊसाहेब निमसे,शरद कुटे,बाबासाहेब कुटे,रमेश मरकड हे उपस्थित होते.         

 पुढे बोलताना मरकड म्हणाले की, आपण कट्टर भाजप प्रेमी असलो तरीही सध्याची तालुक्यातील भाजप ही राजळे जनता पार्टी झाल्याने आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.मी भाजप मध्ये असताना जी हिंदुत्वाला पूरक अशी भूमिका घेतली होती त्याचे कौतुक  मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे  यांनी केले होते. येणाऱ्या ७९ ग्रामपंचायत निवडणूका व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असून तिसगाव गटातून मी स्वतः उमेदवारी करणार आहे.                                                                                                                                        माझी निवड ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे,राम रेपाळे व राजळे यांना धोबीपछाड देणाऱ्या अरुण मुंडे यांनी केली असून मी त्यांचा आभारी आहे.आगामी निवडणुका लढवु इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधावा.                                                                       

पाथर्डी शहरात लवकरच पक्षाचे कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. जनतेची सर्व प्रश्ने आम्ही सोडवणार असून अगोदर हात जोडून कामे झाली तर ठीक अन्यथा हात सैल सोडून सुद्धा कशी कामे करायची ते आम्हाला माहित आहे.हिंदुत्वाला मानणारी सर्व मंडळी आमच्या पाठीशी आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही पक्षधर्म म्हणून भाजप उमेदवार अक्षय कर्डीले यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS