Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

8 महिला पोलीसांवर उपायुक्त आणि दोन निरीक्षकाकंडून बलात्कार

मुंबई प्रतिनिधी - पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस

पोल्ट्री धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवू
महिलेच्या गळ्यातील साखळी ओढून चोरटे फरार.
कर्जतमध्ये कवयित्री स्वाती पाटील यांनी केला पत्रकारांचा सत्कार

मुंबई प्रतिनिधी – पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला. एवढंच नाहीतर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं. मुंबई पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एवढंच नाहीतर या महिला पोलीस कर्मचारी गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीनं गर्भपात करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडीओ देखील या अधिकाऱ्यांनी बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

COMMENTS