अशोक खरातच्या पत्नीच्या जामीन अर्जावर १६ एप्रिलला सुनावणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातच्या पत्नीच्या जामीन अर्जावर १६ एप्रिलला सुनावणी

 राहाता : भोंदूगिरी व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिने जामीन मिळविण्यासाठी राहाता न्यायालयात दाखल केलेल्य

शुभ्रा रंजनचे अपहरण करत उकळली खंडणी; तब्बल 1 कोटी 89 लाखाची उकळली खंडणी; आरोपी निघाला विद्यार्थीच
खरात प्रकरणात गर्भपातासाठी डॉक्टरांची मदत ?पोलिसांकडून त्या नामांकित डॉक्टरांचा शोध सुरू
अशोक खरातच्या कोठडीत वाढ, चौदावा गुन्हा दाखल
The current image has no alternative text. The file name is: Ashok-kharat.jpg

 राहाता : भोंदूगिरी व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिने जामीन मिळविण्यासाठी राहाता न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली असून, पुढील सुनावणीसाठी १६ एप्रिल तारीख निश्चित करण्यात आली आहे.

 या प्रकरणात आरोपीच्या बाजूने ऍड. कोल्हे यांनी बाजू मांडली, तर सरकार पक्षाच्या वतीने ऍड. पानगव्हाणे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील तारखेला सुनावणी ठेवली.

दरम्यान, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जमीन व्यवहार, बनावट कागदपत्रे तसेच सावकारीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या जाळ्याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू असून, लवकरच धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका  पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या चार बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याच्यावर भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करणे, नागरिकांना धमकावून जमिनी बळकावणे, व्याजाने पैसे देऊन फसवणूक करणे आदी गंभीर आरोपांखाली विविध गुन्हे दाखल आहेत. या सर्व बाबींची पोलिसांकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.

 दरम्यान, आरोपीची पत्नी कल्पना खरात ही फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीकडे परिसराचे लक्ष लागले होते. समता पतसंस्थेत ५७ व्यक्तींच्या नावावर सुमारे १०० खाती उघडल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी सुमारे ३३ जणांची चौकशी पोलिसांनी केली आहे. तसेच जगदंबा पतसंस्थेतही इतरांच्या नावाने खाती उघडल्याचा प्रकार समोर आला आहे.

 या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्याची माहिती समोर येत आहे.

COMMENTS