Homeताज्या बातम्याबीड

विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार करिअरची निवड होणे आवश्यक-प्रो. डॉ. सतीश दांडगे

विद्यार्थ्यांना समजून घेऊन पालक व शिक्षकांनी त्यांच्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आज मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षम

गेवराई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ सुरू करा; अन्यथा ‘छावा क्रांतिवीर सेने’चा आंदोलनाचा इशारा
आदित्य महाविद्यालयात रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेचे मूल्यमापन कार्यशाळाविद्यार्थ्यांच्या क्लीनिकल व व्यावसायिक कौशल्य विकासासाठी 6 तास विशेष प्रशिक्षण.
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह



विद्यार्थ्यांना समजून घेऊन पालक व शिक्षकांनी त्यांच्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन करण्याची आज मोठी गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षमता असते, ती ओळखून त्याला योग्य क्षेत्राची निवड करून देणे महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांवर केवळ अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या आवडीनुसार त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते जीवनात निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असे प्रतिपादन प्रो.डॉ.सतीश दांडगे यांनी केले.
देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी इंग्लिश स्कूल व तुलसी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तुलसी समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, प्रा. संजय खाडे, प्राचार्या उमा जगतकर, प्राचार्य प्रा. प्रकाश ढोकणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रातील सर्वोच्च यश संपादन करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवले पाहिजे. मोबाईल व वेळेचा सदुपयोग करून मेहनत, वाचन आणि कौशल्य विकासावर भर दिल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी स्वयंप्रकाशित होऊन स्वतःचे करिअर स्वतः घडवावे. जगात बदल घडवायचा असेल तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रा. संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रम, करिअरच्या संधी तसेच गएए आणि छएएढ सारख्या स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रकाश ढोकणे यांनी महाविद्यालयाच्या उज्वल निकालाचा गौरव केला व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, तुलसी समूहाचे पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सिद्धीक यांनी केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS