Homeताज्या बातम्या

आदिवासी विकास परिषदेच्या प्रदेश संपर्कप्रमुख पदी सचिन देशमुख यांची निवड

अकोले: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या प्रदेश संपर्कप्रमु

रानडुकरांचा हैदोस; कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे डाळिंब बागेचे लाखोंचे नुकसान, वन विभागाकडे भरपाईची मागणी
‘गद्दार’ खासदारांविरोधात शिवसैनिकांचा संताप! नांदेड विमानतळाबाहेर ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजीनंतर ३९ जणांना अटक
लूटमार करणारी टोळी जेरबंद; पाच आरोपींना अटक, बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई

अकोले: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या प्रदेश संपर्कप्रमुख पदी अकोले तालुक्यातील राजूर येथील धडपडे युवक कार्यकर्ते सचिन गणपतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा संघटक सचिव पदावर लालू भांगरे, जिल्हा संघटक पदावर गंगाराम धिंदळे यांची तर डॉक्टर फोरमच्या अहिल्यानगर जिल्हा संघटक पदावर डॉ. रामनाथ मुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन देशमुख यांचा आदिवासी समाजात असलेला दांडगा जनसंपर्क, दुर्बल, शोषित व पीडितांवरील अन्यायाविरोधात उभारलेले सामाजिक लढे, तसेच आरोग्य, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्तीसाठी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले सामाजिक प्रबोधन या सर्व कार्याची दखल घेण्यात आली. त्यांच्या या योगदानामुळेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण यांनी सचिन देशमुख यांची प्रदेश संपर्कप्रमुख पदी नियुक्ती जाहीर केली.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश महासचिव केशव तिराणिक आणि मुंबई-कोकण विभागाचे विभागीय अध्यक्ष रामनाथ भोजने यांच्या शुभहस्ते सचिन देशमुख यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सचिन देशमुख यांच्यासह लालू भांगरे, गंगाराम धिंदळे आणि डॉ. रामनाथ मुठे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

COMMENTS