Homeताज्या बातम्या

वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ‘एसआयआर मॅपिंग’ नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन11 व 12 जुलै रोजी ओम नमो सदन येथे शिबिर; नागरिकांनी कुटुंबियांसह उपस्थित राहावे – अ‍ॅड. गोविंदा शिराळे पाटील

लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
तोहिद खान हत्याप्रकरणी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. धनंजय मुंडे यांचे समर्थनआ. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्याचा मौलाना आझाद सामाजिक फाउंडेशनकडून निषेध
पाटोदा तालुक्यात सोलार प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसादकेंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी नवी दिल्लीत सविस्तर चर्चा



लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या उद्देशाने बीड शहरातील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ‘एसआयआर  मॅपिंग’ नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे विशेष शिबिर शनिवार, दि. 11 जुलै आणि रविवार, दि. 12 जुलै रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात, ओम नमो सदन, जिजाऊ नगर, रेणू हॉस्पिटलसमोर, बार्शी रोड, बीड येथे होणार आहे. यावेळी वॉर्डातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबियांसह शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणी, पडताळणी तसेच आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन भाजपा नगरसेवक अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शिबिरस्थळी अधिकृत बीएलओ (एसआयआर) अधिकारी तसेच बूथस्तरीय कार्यकर्ते दिवसभर उपस्थित राहणार असून, मतदार नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया सुलभ आणि जलद पद्धतीने पार पाडली जाणार आहे. शिबिराला येताना नागरिकांनी आधार कार्ड, जुने मतदार ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सोबत आणावीत. त्यामुळे जागेवरच पडताळणी व नोंदणीची प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करता येणार आहे. मतदार यादीतील नाव अचूक असणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वॉर्ड क्रमांक 25 मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली नोंदणी पूर्ण करावी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अ‍ॅड. गोविंदा भैया शिराळे पाटील यांनी केले आहे.

COMMENTS