राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवार (दि. 27 जून) रोजी बीड जिल्ह्य

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते तथा आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शनिवार (दि. 27 जून) रोजी बीड जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्यात पक्ष संघटनाबरोबरच शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार असून आगामी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
सकाळी 10 वाजता बार्शी रोड, बीड येथील राष्ट्रवादी भवन येथे पक्षाची जिल्हास्तरीय व्यापक बैठक होणार असल्याची माहिती पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पक्षाचे हितचिंतक सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’तील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी तसेच मराठवाड्यातील विविध जनप्रश्नांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने रोहित पवार यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. बीडमधील बैठकीत जिल्हा संघटना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून, शेतकरी प्रश्न, संघटनात्मक बांधणी, आगामी आंदोलनांची रूपरेषा आणि भविष्यातील राजकीय कार्यक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही कार्यक्रम आहे. या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

COMMENTS