Homeताज्या बातम्याराजकारण

मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

आगामी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण (डखठ) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने बीड येथे महत्वपूर्

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
बीड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था9 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करा – डॉ. गणेश ढवळे यांची आ. संदीप क्षीरसागरांकडे मागणी



आगामी महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण (डखठ) अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने बीड येथे महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत बी.एल.ए. निवड, बूथनिहाय संघटन मजबुतीकरण तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटनेची रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान परशुराम जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण मोहिमेला अत्यंत गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत राहिले पाहिजे. गावपातळीपासून बूथपातळीपर्यंत शिवसैनिकांनी सक्रिय राहून पक्ष संघटना अधिक मजबूत करावी. आगामी काळात शिवसेना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे काम सर्वांनी मिळून करावे, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रत्येक बूथवर सक्षम बी.एल.ए. नियुक्त करण्याचे निर्देश दिले. शिवसेनेची ताकद ही तळागाळातील शिवसैनिकांमध्ये आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन वाढीसाठी झोकून देऊन काम करावे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येक बूथ मजबूत करणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटन विस्तार, नवीन सदस्य नोंदणी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. या बैठकीस माजी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, जिल्हा समन्वयक संजय भाई महाद्वार, रतन गुजर, उपजिल्हाप्रमुख अजिनाथ खेडकर, तालुकाप्रमुख सोपान मोरे, मुकुंद शिंदे, सुभाष राऊत, विधानसभा प्रमुख सुशील पिंगळे, नितीन धांडे तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS