Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीच्या गुन्ह्यातील ‘बंटी-बबली’ २४ तासांत अटक

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ७६ वर्षीय सुलोचना पांडुरंग देशमाने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आला

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मोठा अनर्थ! अहिल्यानगरमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान हँड ग्रेनेड फुटल्याने प्रचंड खळबळ
शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील लांडे खून प्रकरण
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ७६ वर्षीय सुलोचना पांडुरंग देशमाने यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कारवाई करत आरोपी जोडप्याला अटक केली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी प्रकाश पंढरीनाथ ढवळे व त्यांची पत्नी कल्पना प्रकाश ढवळे (दोघे रा. उल्हासनगर, जि. ठाणे) हे पळून जाण्याच्या तयारीत असताना नेवासा फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक झिने, पोलीस नाईक अशोक कुदळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिवानी गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल पठाण चांद यांचा सहभाग होता.

COMMENTS