Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंद्याचा गोव्यात ऐतिहासिक डंका; ९ सुवर्णपदकांसह २ ‘नॅशनल टायटल बेल्ट’वर कोरले नाव

श्रीगोंदा : गोव्यातील म्हापसा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल थाय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप’मध्ये श्रीगोंदा तालुक्याने अभूतपूर्व कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केला आहे. ‘श्रीगोंदा कराटे, बॉक्सिंग क्लास’च्या खेळाडूंनी या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ९ सुवर्णपदके आणि २ मानाचे नॅशनल टायटल बेल्ट पटकावून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. ही कामगिरी केवळ पदकांची नसून, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक ठरली आहे. या यशामागे प्रमुख भूमिका बजावली ती ग्रँड मास्टर समीर पांढरकर यांनी. गेल्या २५ वर्षांपासून ते श्रीगोंदा तालुक्यात मार्शल आर्ट्स क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या कठोर प्रशिक्षण पद्धती, शिस्त आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या क्षमतेमुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. सध्या हे सर्व खेळाडू श्रीगोंद्यातील पंतनगर कम्युनिटी हॉल येथे नियमित सराव करत आहेत. या यशानंतर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सुवर्णपदकप्राप्त खेळाडू या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रिया अजय खेडकर, आदिराज सुधीर तरटे, स्वरा सागर सोमवंशी, आरोही शरद तरटे, तेजस्विनी ज्ञानदेव भागवत, आराध्या संतोष कुरुमकर, धनश्री विठ्ठल कुरुमकर,  शर्वरी योगेश टकले, सार्थक विकास खेतमाळीस या सर्व खेळाडूंनी आपल्या कौशल्य, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ‘नॅशनल टायटल बेल्ट’वर श्रीगोंद्याचा ठसा स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रीमियर लीग रिंग फाईटमध्ये दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर अव्वल क्रमांक मिळवत ‘टायटल बेल्ट’ जिंकण्याचा मान मिळवला. वैष्णवी ज्ञानदेव भागवत ६५ प्लस किलो वजन गट तर ओम समीर पांढरकर ८० प्लेस किलो वजन गटात आपला लौकिक वाढवला.

सोनई आरोग्य केंद्रात ‘आरोग्य अधिकारी’ द्या; नागरिकांची मागणी ; रुग्णांची हेळसांड
पाथर्डी – गेवराई बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकात उत्साह
साई सेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संताप‘बचाव कृती समिती’चे तहसीलसमोर उपोषण

श्रीगोंदा : गोव्यातील म्हापसा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘नॅशनल थाय किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप’मध्ये श्रीगोंदा तालुक्याने अभूतपूर्व कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केला आहे. ‘श्रीगोंदा कराटे, बॉक्सिंग क्लास’च्या खेळाडूंनी या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ९ सुवर्णपदके आणि २ मानाचे नॅशनल टायटल बेल्ट पटकावून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. ही कामगिरी केवळ पदकांची नसून, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक ठरली आहे.

या यशामागे प्रमुख भूमिका बजावली ती ग्रँड मास्टर समीर पांढरकर यांनी. गेल्या २५ वर्षांपासून ते श्रीगोंदा तालुक्यात मार्शल आर्ट्स क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या कठोर प्रशिक्षण पद्धती, शिस्त आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या क्षमतेमुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. सध्या हे सर्व खेळाडू श्रीगोंद्यातील पंतनगर कम्युनिटी हॉल येथे नियमित सराव करत आहेत. या यशानंतर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सुवर्णपदकप्राप्त खेळाडू

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रिया अजय खेडकर, आदिराज सुधीर तरटे, स्वरा सागर सोमवंशी, आरोही शरद तरटे, तेजस्विनी ज्ञानदेव भागवत, आराध्या संतोष कुरुमकर, धनश्री विठ्ठल कुरुमकर,  शर्वरी योगेश टकले, सार्थक विकास खेतमाळीस या सर्व खेळाडूंनी आपल्या कौशल्य, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना नमवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

‘नॅशनल टायटल बेल्ट’वर श्रीगोंद्याचा ठसा

स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठेच्या प्रीमियर लीग रिंग फाईटमध्ये दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर अव्वल क्रमांक मिळवत ‘टायटल बेल्ट’ जिंकण्याचा मान मिळवला. वैष्णवी ज्ञानदेव भागवत ६५ प्लस किलो वजन गट तर ओम समीर पांढरकर ८० प्लेस किलो वजन गटात आपला लौकिक वाढवला.

COMMENTS