Homeताज्या बातम्यामनोरंजन

“तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता झळकणार मोठ्या पडद्यावर

मुंबई प्रतिनिधी - छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने 15 वर्षांपासून आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे.

रशियन सैन्याने चुकून स्वतःच्याच देशात टाकला बॉम्ब
लोकसभेत भाजप खासदाराची शिवीगाळ
वार पठ्या…बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही | LokNews24

मुंबई प्रतिनिधी – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने 15 वर्षांपासून आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अश्यातच, आता या मालिकेवर चित्रपट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर बोलताना मालिकेचे निर्माते असित मोदी म्हणाले, ‘लोकांना हा शो खूप आवडतो. 15 वर्षे झाली आणि लोक अजूनही ते पाहत आहेत. लोक हा शो केवळ टेलिव्हिजनवरच नव्हे तर ओटीटी, यूट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात, त्यामुळे मला वाटले की शोच्या पात्रांसोबत काहीतरी केले पाहिजे. आज जेठालाल, बबिता, दयाबेन, सोधी आणि शोमधील इतर पात्र घरोघरी नावारूपास आले आहेत. तो प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यासारखा आहे. 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे प्रेम आपल्याला मिळत आहे आणि म्हणूनच मी एक विश्व निर्माण करण्याचा विचार केला आहे. तसेच, आगामी काळात तारक मेहता शोवर चित्रपटही बनवणार आहे. एक अॅनिमेटेड चित्रपटही असेल. सर्व काही केले जाईल. आम्हाला तारक मेहता शो मॉलसारखा बनवायचा आहे जिथे सर्वकाही होईल’. असं ते म्हणाले.

COMMENTS