Homeताज्या बातम्या

बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या सीएमई कार्यक्रमास जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या वतीने दिनांक 28/06/2026 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या सीएमई कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील सर्व तालुक

देगलूरच्या रुग्णालयासाठी 22.97 कोटींचा निधी मंजूर; 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारणार
मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 262 रुग्णांची तपासणी
आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचार्‍यांनाराज्य विमा योजना लागू करण्याचा प्रस्ताव सादर करासार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश



बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या वतीने दिनांक 28/06/2026 रोजी  आयोजित करण्यात आलेल्या सीएमई कार्यक्रमास बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील क्लिनिकल लॅबोरेटरी व्यावसायिक, पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. महादेव चिंचोले सर (सिव्हिल सर्जन, चंद्रपूर) आणि तसेच उद्घाटक म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड डॉ नागेश चव्हाण सर व कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनंत मुळे (अध्यक्ष, आयएमए बीड), डॉ. विवेक पालवणकर सर, डॉ. विवेक दुसाने सर, डॉ. सुधीर जाधव सर, डॉ. जयश्री बांगर मॅडम, डॉ वर्षा नाईकवाडे मॅडम तसेच बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी प्रयोगशाळा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण, अचूक निदान आणि आरोग्यसेवेत प्रयोगशाळांची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश काकडे, फुलचंद दराडे, बिभीषण शेंडगे, अब्दुल हन्नान सय्यद, शरद भोईटे, नितीन काकडे, राम बोराडे, दत्ता चव्हाण आणि शेख गोहर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील लॅबोरेटरी व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सीएमई कार्यक्रमामुळे प्रयोगशाळा क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान, नवीन तांत्रिक बाबी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर, तज्ज्ञ वक्ते, लॅब बंधू-भगिनी तसेच सर्व सहकार्‍यांचे बीड जिल्हा क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशनच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करून प्रयोगशाळा क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा संकल्प असोसिएशनने व्यक्त केला.

COMMENTS