बीड: शहराच्या अज़ीज़पुरा भागातील रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक मुख़्तारखान गुलज़ारखान पठाण यांना पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस मह

बीड: शहराच्या अज़ीज़पुरा भागातील रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक मुख़्तारखान गुलज़ारखान पठाण यांना पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करणार्या अधिकार्यांना दिल्या जाणार्या या मानाच्या सन्मानचिन्हाचे वितरण नुकतेच करण्यात आले. सन 2025 या वर्षासाठी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथील बिनतारी संदेश विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली. पोलीस निरीक्षक पठाण हे मूळचे बीड शहरातील असून त्यांनी आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण बीडमध्येच पूर्ण केले. शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. आपल्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि उत्कृष्ट सेवेमुळे त्यांनी पुढे पोलीस निरीक्षक पदापर्यंत प्रगती केली. सध्या ते अहिल्यानगर येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक 1 मे 2026 रोजी त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बालपणीचे मित्र मझहर शेख, मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ, मीर एजाज अली उस्मानी, कलीम शेख, फारुख शेख, नजीर शेख, शकील शेख यांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS