Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

माहूर बसस्थानकावर  एसटी चालक-वाहकांची मनमानी..? प्रवाशांना वार्‍यावर सोडून नागपूर-किनवट बस निघून गेल्याने संताप..!बस थांबविण्यासाठी प्रवासी ओरडले, मागे धावले; तरीही बस पसार ; नियंत्रण कक्षातही इंट्री नाही..?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना  सोमवारी दि. 18 मे रोजी रात्री

81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
गावठी कट्टे विकणारा कर्जत पोलिसांच्या जाळ्यात दोन गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे जप्त ; ६२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
अशोक खरातला सहा दिवसांची ईडी कोठडीपतसंस्थेच्या बोगस खात्यांतून कोट्यवधींची उलाढाल



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना  सोमवारी दि. 18 मे रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास माहूर बसस्थानकावर घडली असून किनवट आगाराच्या नागपूर-किनवट बसने बसस्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांना न घेताच बसस्थानक परिसरातून निघून गेल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री अंदाजे 8:10 वाजताच्या सुमारास माहूर बसस्थानकावर हदगाव आगाराची बस व माहूर-लातूर बस अशा दोन बस आलेल्या होत्या. बसमधून उतरलेले सुमारे 20 ते 25 महिला व पुरूष प्रवासी किनवट मार्गावर जाण्यासाठी नागपूर किनवट बसची प्रतीक्षा करीत होते. असे असताना, संबंधित नागपूर-किनवट बसने बसस्थानकात येऊनही नियमानुसार थांबा न घेता केवळ परिसरात फेरी मारली व उपस्थित प्रवाशांना न घेताच पुढे निघून गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, बस थांबविण्यासाठी प्रवाशांनी मोठ्याने आवाज दिला, हातवारे केले, काही प्रवासी तर बसच्या मागे धावत गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, तरीदेखील बस न थांबल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे महिला, सामान्य नागरिक व दूरवर जाणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे भावना अनेक प्रवाशांनी बोलून दाखवली असून चालक वाहकाच्या या कृतीवर संताप व्यक्त होत आहे.  दरम्यान, या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, संबंधित बसच्या चालकाने माहूर बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात नियमानुसार इंट्री/नोंदच केली नसल्याचे वास्तव असून प्रवाशांना न घेताच बस निघून गेल्याने खळवळलेल्या प्रवाशांनी सदर गाडीचा नंबर व चालक वाहकाच्या नोंदीबाबत वाहतुक नियंत्रण कक्षाकडे विचारणा केली असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. चालक वाहकाचा हा प्रकार केवळ प्रवाशांना सेवा नाकारण्यापुरता मर्यादित न राहता महामंडळाच्या वाहतूक नियंत्रण नियम, सेवा शिस्त व प्रशासकीय प्रक्रियेच्या सरळ उल्लंघनाचा प्रकार असून या घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या प्रवाशांनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करताना संबंधित चालक-वाहकाविरुद्ध कठोर विभागीय कारवाईची मागणी केली आहे. सदर प्रकरणी विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नांदेड विभाग, नांदेड. यांच्यासह विभागीय वाहतूक अधिकारी, म.रा.मा.प. महामंडळ, नांदेड विभाग, नांदेड, आगार व्यवस्थापक, किनवट आगार, स्थानक प्रमुख / वाहतूक नियंत्रक, माहूर या संबंधित कार्यालयांकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आता या प्रकरणात एसटी प्रशासन संबंधित चालक-वाहकावर नेमकी कोणती कारवाई करते याकडे प्रवासी व नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी सीसीटीव्ही  फुटेज, नियंत्रण कक्ष नोंदवही, -ीीर्ळींरश्र-ऊशर्रिीीीींश ठशसळीींशी, ड्युटी चार्ट, लॉगबुक व बस मूव्हमेंट रेकॉर्ड तपासून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत असून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य वापरणारी  एसटी सेवाच जर प्रवाशांनाच नाकारत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास कोणावर ठेवायचा.? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS