Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार महत्वाचे; पं तप्रधान मोदी यांचे मन की बात कार्यक्रमातून प्रतिपादन

नवी दिल्ली : सध्याच्या जागतिक परिस्थितीत वाढत्या संघर्ष, अस्थिरता आणि तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मानवतेला शांतता आणि संयमाचा मार्ग दाखवणार्‍या भगवा

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह लवकरच भारत दौर्‍यावर
संसदेचे आजपासून विशेष अधिवेशन; नारीशक्ती वंदन कायदा विधेयक लोकसभेत मांडणार
मोदी–नायडू यांच्या विधानांतील विरोधाभास

नवी दिल्ली : सध्याच्या जागतिक परिस्थितीत वाढत्या संघर्ष, अस्थिरता आणि तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मानवतेला शांतता आणि संयमाचा मार्ग दाखवणार्‍या भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. याच मुद्द्यावर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अंतर्मुख होण्याचे आणि बुद्धांच्या शिकवणींचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 133 व्या भागातून संवाद साधताना त्यांनी आगामी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा देत सांगितले की, गौतम बुद्ध यांचे विचार हे केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक संदर्भापुरते मर्यादित नाहीत. उलट, ते आधुनिक जगासाठीही दिशादर्शक आहेत. शांततेची सुरुवात आपल्या मनापासून होते ही बुद्धांची शिकवण आजच्या काळात अधिक लागू पडते, असे त्यांनी नमूद केले. व्यक्तीने स्वतःच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे, हेच खरे यश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी बौद्ध परंपरेतील निसर्गप्रेमाचा विशेष उल्लेख केला. बुद्धांना ज्ञान एका वृक्षाखाली प्राप्त झाले, हा संदर्भ देत त्यांनी निसर्गाशी सुसंवाद राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन हे केवळ धोरणात्मक विषय नसून जीवनशैलीचा भाग असायला हवे, असे त्यांनी सांगितले. देशभरात विविध स्तरांवर पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. विकास आणि विज्ञान यांची सांगड घालताना त्यांनी भारताच्या नागरी अणू कार्यक्रमाचे उदाहरण दिले. या कार्यक्रमामुळे ऊर्जा निर्मिती, औद्योगिक वाढ आणि आरोग्य क्षेत्रात मोठे परिवर्तन घडले आहे. शेती, वैद्यकीय संशोधन आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञानाचा उपयोग मानवकल्याणासाठी कसा करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण संवादातून पंतप्रधानांनी एक व्यापक संदेश दिला-आधुनिक विकास साधताना मानवी मूल्ये, पर्यावरणाची जपणूक आणि वैज्ञानिक प्रगती यांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. बुद्धांच्या विचारांवर आधारित जीवनशैली स्वीकारल्यास व्यक्ती आणि समाज दोन्ही स्तरांवर सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सौर आणि पवन ऊर्जा भारताच्या भविष्यासाठी अत्यावश्यक
ऊर्जा क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना पंतप्रधानांनी स्वच्छ ऊर्जेच्या वापरावर भर दिला. सौर आणि पवन ऊर्जा ही भारताच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही केवळ पर्यावरणाची गरज नसून आर्थिक आणि सामरिक दृष्ट्याही महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने वीज वाचवणे आणि स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. भारताच्या पवन ऊर्जेतील झपाट्याने होत असलेल्या प्रगतीकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, देशाची एकूण पवन ऊर्जा निर्मिती क्षमता 56 गिगावॉटपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या एका वर्षात सुमारे 6 गिगावॉट क्षमतेची वाढ झाली असून, भारत सध्या जगात चौथ्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

COMMENTS