Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहापूर शिवारात विवाहित महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह 

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर शिवारात मंगळवारी सकाळी जयश्री संदीप डांगे (वय 35) या विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जयश्री यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी पती, सासू आणि सासर्‍यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पती संदीप डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारीच जयश्री या माहेरचा कार्यक्रम आटोपून सासरी परतल्या होत्या, मात्र दुसर्‍याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री डांगे सोमवारी आपल्या वडिलांसोबत सासरी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी अचानक त्यांचा मृतदेह घरासमोरील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर मृताच्या माहेरकडील नातेवाईक आक्रमक झाले होते. घरासमोरच अंत्यविधी करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता, मात्र पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले व तुषार गलांडे यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास विहिरीलगतच अंत्यविधी पार पडला.  दरम्यान, बाळासाहेब कचरू थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरचे छळ करत असल्याच्या आरोपावरून सासरे नानासाहेब वामन डांगे, सासू विमलताई डांगे आणि पती संदीप डांगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयश्री यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
सावकाराचा त्रास; शेतकऱ्याची उपाधीक्षकांकडे धाव
खंडणीप्रकरणी कुख्यात बबलू गोलेकरविरुद्ध गुन्हा; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांना जीवे मारण्याची धमकी

कोपरगाव : तालुक्यातील शहापूर शिवारात मंगळवारी सकाळी जयश्री संदीप डांगे (वय 35) या विवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जयश्री यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी पती, सासू आणि सासर्‍यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पती संदीप डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारीच जयश्री या माहेरचा कार्यक्रम आटोपून सासरी परतल्या होत्या, मात्र दुसर्‍याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री डांगे सोमवारी आपल्या वडिलांसोबत सासरी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी अचानक त्यांचा मृतदेह घरासमोरील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेनंतर मृताच्या माहेरकडील नातेवाईक आक्रमक झाले होते. घरासमोरच अंत्यविधी करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता, मात्र पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले व तुषार गलांडे यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास विहिरीलगतच अंत्यविधी पार पडला.

 दरम्यान, बाळासाहेब कचरू थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरचे छळ करत असल्याच्या आरोपावरून सासरे नानासाहेब वामन डांगे, सासू विमलताई डांगे आणि पती संदीप डांगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयश्री यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

COMMENTS