Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंग करणारा आरोपी पुण्यातून जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; एक महिन्यानंतर जेरबंद  

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मिठीत कवटाळत विनयभंग करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी पुण्यातून

गोरेगाव ‘नेस्को’ ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; बॉलिवूड कनेक्शन उघड, सीसीटीव्हीमुळे खळबळ!
गुजरातमध्ये 2500 कोटींचा सायबर घोटाळा उघड; आत्तापर्यंत 20 बँक अधिकार्‍यांना पोलिसांनी केली अटक
क्रिकेटपटू आणि खा.युसूफ पठाण यांच्या सासर्‍याला आणि मेहुण्याला अटक
बडतर्फ केलेल्या पोलीसाने हवेत गोळीबार करत वरिष्ठ अधिकाऱ्यावर रोखला पिस्तूल

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मिठीत कवटाळत विनयभंग करणाऱ्या आरोपीला राहुरी पोलिसांनी पुण्यातून जेरबंद केले आहे. अय्याज उर्फ वसीम अक्रम आयुब पठाण (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिची छेड काढून तिला मिठीत घेत विनयभंग केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नेमली होती. मात्र तब्बल एक महिना आठ दिवस आरोपीबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध होत नव्हती.

 दरम्यान, ६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी हा ओळख लपवून पुणे येथे राहत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या परवानगीनंतर पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, पोकॉ. गणेश लिपने यांच्या पथकाला पुण्याकडे रवाना करण्यात आले. पथकाने पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवून पहाटे २ वाजण्याच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेत राहुरी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस कोठडी रिमांडसाठी त्यास अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

COMMENTS