Homeताज्या बातम्या

‘रयत’च्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी कार्यकारी मंडळावर बोडखे

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांची संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी, साताराच्या कार्यकारी मंडळा

समान गुण, वेगवेगळे पर्सेंटाईल; एमएचटी-सीईटी निकालावर विद्यार्थ्यांचा संताप आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर वाढणार! पुणे, मराठवाडा व विदर्भासाठी सतर्कतेचा इशारा
हदगाव येथे भाजपची बूथस्तरीय कार्यकर्त्यांची बैठक २७ जून रोजी; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरणार

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांची संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी, साताराच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

कर्मवीर विद्याप्रबोधिनी ही रयत शिक्षण संस्थेची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी कार्यरत असलेली महत्त्वाची संस्था असून, राज्यसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, बँकिंग, पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य ती करते.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग गुणवत्ता कक्षाने संपूर्ण संस्थेमध्ये अव्वल क्रमांक प्राप्त केला होता. या यशामागे नवनाथ बोडखे यांचे नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रभावी नेतृत्व महत्त्वाचे ठरले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत संस्थेने त्यांची कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळावर निवड केली आहे.

या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य तथा माजी आमदार राहुलदादा जगताप तसेच उत्तर विभाग समन्वय समिती सदस्य राजेंद्र आबा म्हस्के यांनी नवनाथ बोडखे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नवनाथ बोडखे यांच्या निवडीमुळे उत्तर विभागातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमांना अधिक बळ मिळणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS