Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंदिरातील तीन दानपेटया चोरट्यांनी फोडल्या

ताहराबाद येथील संत महिपती महाराजांच्या मंदिरातील घटना

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज मंदिरात चोरट्यांनी तीन दानपेट्या फोडून त्यामधील हजारो रूपयांवर

नगरच्या किल्ल्यात देशविरोधात घोषणा देणारा अटकेत
दुकान फोडून लंपास केलेले साडेचार लाखांचे २३ मोबाईल पोलिसांनी दिले दुकानदाराला परत
 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज मंदिरात चोरट्यांनी तीन दानपेट्या फोडून त्यामधील हजारो रूपयांवर डल्ला मारलाय.12 मार्च रोजी सकाळी मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत कवी महिपती महाराज यांचे राहुरी तालूक्यातील ताहराबाद येथे मंदिर आहे. जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे. दिनांक 11 मार्च रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान मंदिरातील पुजारी घरी निघून गेल्या नंतर अज्ञात चोरट्यांनी मंदीरात प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी मंदिरातील तीन दानपेट्या व सीसीटिव्ही फुटेज चा डिव्हीआर चोरुन नेलाय. परिसरातील नागरीकांनी मंदिर परिसरात शोध घेतला असता एक दानपेटी मंदिराच्या आवारात दिसून आली तर दोन दानपेट्या मंदिरा मागील परिसरात फोडलेल्या अवस्थेत मिळून आल्या. चोरट्याने तीन दानपेट्यां मधील अंदाजे 15 हजार रूपयांची रोख रक्कम व 3 हजार रुपए किंमतीचे सिसिटीव्ही फुटेजचे चित्रीकरणचे स्टोरेज करणारे डिव्हीआर असा एकूण 18 हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केलाय. संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट चे कर्मचारी सुभाष लक्ष्मण मुंढे हे दिनांक 12 मार्च रोजी सकाळी सहा वाजता मंदिरात आले असता मंदिरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र रावसाहेब साबळे, राहणार रामपुर, ता. राहुरी. यांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राहुरी येथील पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. राजेंद्र रावसाहेब साबळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 280/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

COMMENTS