कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनिअर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज विज्ञान, गौतम कला व संजीवनी वाणिज्य महाविद्यालयातील ज्युनिअर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्राध्यापक धनंजय हांडे हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयात सेवापूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. संदीप वर्पे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हिरालाल महानुभाव उपस्थित होते. महाविद्यालय सेवक कल्याण समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रा. धनंजय हांडे व स्वाती हांडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे हिरालाल महानुभाव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “प्रा. धनंजय हांडे हे शिस्तप्रिय, नियमबद्ध, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्यांना विशेष आदराचे स्थान आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा ज्ञानदानाचा प्रवास अविरत सुरू राहावा,” अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात ऍड. संदीप वर्पे यांनी प्रा. हांडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कामाप्रती निष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी आदर्श शिक्षक म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे.”
कार्यक्रमाच्या स्वागतपर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, “सेवापूर्ती म्हणजे जीवनाला लागलेला पूर्णविराम नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. उर्वरित आयुष्यात आपल्या आवडी-निवडी जोपासत ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवावे..” यावेळी त्यांनी प्रा. हांडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS