Homeताज्या बातम्या

मतदार पडताळणीसाठी बीएलओंनी घरोघरी जावेग्राहक पंचायतची मागणी

अकोले : अकोले तालुक्यात सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत बीएलओंनी वस्ती-पाड्यांवर जाऊन प्रत्येक मतदारापर्यंत अर्ज पोहोचवून प्रत्यक्ष पडताळणी करावी, तसेच सध्याच्या पावसाळी परिस्थितीमुळे या मोहिमेला किमान एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, अकोले हा आदिवासी तालुका असून अनेक दुर्गम वस्ती-पाड्यांवर अजूनही निरक्षर नागरिक मोठ्या संख्येने आहेत. सध्या बीएलओंकडून गावातील ठरावीक ठिकाणीच अर्ज वाटप व संकलन केले जात आहे. त्यामुळे अनेक पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.बीएलओंनी त्रयस्थ व्यक्तींकडून माहिती घेण्याऐवजी संबंधित कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊनच अर्ज भरावेत. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी न करता माहिती नोंदवली जात असल्याच्या तक्रारी असून, कोणताही नागरिक मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गम भागात वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे तसेच बीएलओंना प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणे कठीण होत आहे. या परिस्थितीमुळे अनेक पात्र मतदारांची पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने एसआयआर प्रक्रियेला आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तसेच काही मतदारांनी भरलेले एन्युमरेशन फॉर्म वेळेत ऑनलाइन डिजिटायझेशन न झाल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्रयस्थ व्यक्तींकडून माहिती घेणाऱ्या संबंधित बीएलओंवर शासकीय सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, माधवराव तिटमे, सचिव राम रुद्रे, अध्यक्ष दत्ता शेनकर, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सुरेश गबाले, रामदास पवार, अशोक उघडे, मोहन मुंढे, राजेंद्र लहामगे, ज्ञानेश्वर पुंडे, रामदास पांडे, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे, शांताराम दराडे, भाऊसाहेब आभाळे, भाऊसाहेब गोर्डे, शुभम खर्डे, गणपत थिगळे, दत्तात्रय मुठे, पांडुरंग पथवे, दत्ता ताजणे, रामहारी तिकांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी, अहिल्यानगर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत

अकोले तालुक्यात गारपीट; शेतीचे नुकसान
भंडारदरा शताब्दीपूर्वी विस्थापितांचा प्रश्न सोडवा; कार्यवाही न झाल्यास धरण शताब्दी कार्यक्रम उधळून लावू; किसान सभेचा इशारा
उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा
Maharashtra poll body awaits updated voter list from ECI, likely to wait  till nomination process for rural body polls | Mumbai News - The Indian  Express

COMMENTS