Homeताज्या बातम्या

उखलगावात हरित अभियानाला वेगपाच हजार वृक्षरोपांची लागवड, जीपीएस मॅपिंग पूर्ण

श्रीगोंदा  : पर्यावरण संवर्धन, हरित ग्राम निर्मिती आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याच्या उद्देशाने उखलगाव येथे राबविण्यात येत असलेल्या हरित अभियानाला मोठे यश मिळाले आहे. गावात विविध संस्था, ग्रामपंचायत, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून आतापर्यंत सुमारे ५ हजार वृक्षरोपांची लागवड करण्यात आली असून, लागवड केलेल्या प्रत्येक वृक्षाचे जीपीएस मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनावर सातत्याने लक्ष ठेवणे आणि त्यांचे संगोपन करणे अधिक प्रभावीपणे शक्य होणार आहे.या उपक्रमात Burckhardt Compression India Pvt. Ltd. यांच्या CSR निधीतून आणि चिराग फाउंडेशन यांच्या सहकार्याने गावातील प्रत्येक कुटुंबाला १० आंब्याची रोपे मोफत वितरित करण्यात आली. तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, नाणीजधाम यांच्या कृपाशीर्वादाने गावासाठी ५०० वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात आली. या वृक्षरोपांच्या लागवडीमुळे गावाच्या हरित विकासाला मोठी चालना मिळाली आहे.रोपांचे वितरण आणि लागवड उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन गावातील तरुण सहकारी, ग्रामपंचायत उखलगावचे कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी केले. रोपे वाटप करण्यापूर्वी प्रत्येक ग्रामस्थाने लागवडीसाठी आवश्यक खड्डे तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी नियोजनबद्ध तयारी केली. रोपे मिळाल्यानंतर त्वरित लागवड करून त्यांचे जीओग्राफिकल टॅगिंग करण्यात आले.सरपंच प्रशासक शितल बापूसाहेब ढवळे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “गावाला मिळालेली वृक्षरोपे केवळ लावणे महत्त्वाचे नसून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक ग्रामस्थाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने नियमित पाणी, संरक्षण आणि काळजी घेतल्यास उखलगाव येत्या काही वर्षांत हिरवेगार गाव म्हणून ओळखले जाईल.”या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व स्वामी भक्त, बापूसाहेब ढवळे, गणेश लाकुडझोडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच चिराग फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी घरोघरी आणि शेतांमध्ये भेटी देऊन लागवड केलेल्या रोपांची पाहणी केली

संगमनेरमध्ये उद्या पुस्तक जत्रा 
आ. काळेंमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर : शिंदे 
वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच कर आकारावाआ. आशुतोष काळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Harit Maharashtra Mission: Gadchiroli, Nashik Lead Tree Plantation | हरित  महाराष्ट्र मोहीम

COMMENTS