Homeताज्या बातम्या

एकदरेत पावसासाठी महिलांचे महादेवाला साकडेभजन, पूजा व अभिषेक करून वरुणराजाला प्रार्थना

अकोले : तालुक्यातील दुर्गम भागातील एकदरे व जायनावाडी येथील महिलांनी पावसासाठी महादेव व भैरवनाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीने साकडे घातले. डोक्यावर हंडे व कळशी घेऊन महिलांनी मिरवणूक काढत महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केला. त्यानंतर श्रीफळ अर्पण करून चांगल्या पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाअभावी पेरण्यांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने देवाला साकडे घालण्याचा संकल्प केला.महिलांनी पांडुरंगाच्या नामस्मरणासह भजन करत भक्तिमय वातावरणात महादेव व भैरवनाथाची पूजा केली. पूर्वी महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर पाऊस पडत असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा असून, त्याच परंपरेनुसार यंदाही हा धार्मिक विधी करण्यात आला.यापूर्वी २०२४ मध्येही महिलांनी अशाच प्रकारे सामूहिक प्रार्थना केली होती. त्यानंतर चांगला पाऊस झाल्याची आठवण ग्रामस्थांनी यावेळी सांगितली. यंदाही शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन भरघोस पाऊस पडावा, पिके जोमाने यावीत आणि शेतकरी सुखावावा, अशी प्रार्थना महिलांनी केली.यावेळी गावातील महिलांचा मोठा सहभाग होता. टाळांच्या गजरात भजन म्हणत त्यांनी एकदरे व जायनावाडी येथील महादेव आणि भैरवनाथ मंदिरात सामूहिक पूजा करून पावसासाठी साकडे घातले. सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या नजारा आभाळाकडे लागल्या असून पावसाची आस लागली आहे.

कोतुळेश्वर विद्यालयात रविवारी नूतन इमारतीचे भूमिपूजन
जायनावाडीत ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबीर
हजारो आदिवासी महिलांचे धरणे आंदोलन ‘पेसा ग्रामसभा मोबिलायझर्सची’ पदे कमी करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी

COMMENTS