Homeताज्या बातम्या

बिलोली-धर्माबाद बसस्थानकांचा मराठवाड्यात अव्वल क्रमांक; ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात पटकावला मान

कुंडलवाडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६' अंतर्गत घ

जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त
कुंडलवाडीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन; शांतता राखण्याचे आवाहन
सेंट बस डिपो - बिलोली, नांदेड - Justdial

कुंडलवाडी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान २०२५-२६’ अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात बिलोली व धर्माबाद बसस्थानकांनी मराठवाडा विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाची आणि स्वच्छतेची छाप उमटवत या दोन्ही बसस्थानकांनी बाजी मारली आहे.

या राज्यस्तरीय सर्वेक्षणात ‘ब’ गटामध्ये बिलोली बसस्थानकाने मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावत ५ लाख रुपयांचे पारितोषिक आणि मानाचा चषक मिळविला. तर ‘क’ गटात धर्माबाद बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळवून १ लाख रुपयांचे पारितोषिक व मानाचा चषक आपल्या नावे केला आहे. या उल्लेखनीय यशामुळे बिलोली आगाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. एसटी महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त १ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला यशाची पावती: बसस्थानक परिसरातील आकर्षक ‘लालपरी उद्यान’, स्वच्छ व प्रसन्न वातावरण, प्रवाशांसाठी उपलब्ध आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यामुळेच हे यश मिळाल्याचे बिलोलीचे आगार प्रमुख नरसिंग निमनवाड यांनी सांगितले. बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने घेतलेली मेहनत आणि प्रवाशांप्रती असलेली बांधिलकी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल बिलोली आणि धर्माबाद आगारातील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

‘स्वच्छ स्थानक, सुंदर प्रवास’ हा संदेश आम्ही केवळ फलकांवर न मांडता प्रत्यक्ष कृतीतून साकार केला आहे. विभागातील प्रत्येक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे. आगामी सर्वेक्षणांमध्येही प्रथम क्रमांक कायम राखण्यासाठी आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू.
– नरसिंग निम्मनवाड, आगार प्रमुख, बिलोली

COMMENTS