Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीच्या भूमिपुत्राची मोठी झेप; सुदर्शन होनवडजकर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त

कुंडलवाडी: येथील भूमिपुत्र तथा मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांची नुकतीच बृहन्मुंबई कोकण विभाग-२ येथे सहाय्य

ठाणे जमीन गैरव्यवहार
कुंभमेळ्याच्या २२७० कोटींच्या निधीमध्ये कोट्यवधींची लूट; मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमावी
कर्जमुक्तीसोबतच नैसर्गिक शेतीकडे वळा; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन, अहिल्यानगरमध्ये नऊ हजार हेक्टरवर नैसर्गिक शेती

कुंडलवाडी: येथील भूमिपुत्र तथा मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांची नुकतीच बृहन्मुंबई कोकण विभाग-२ येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), मुंबई शहर पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुंडलवाडी शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सुदर्शन होनवडजकर यांनी आपल्या पोलीस सेवेला पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदापासून सुरुवात केली. त्यानंतर विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहून त्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय क्षमता, शिस्तप्रियता व जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा ठसा उमटवला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत गृह विभाग व पोलीस प्रशासनाने त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती दिली आहे.

मुंबईसारख्या महानगरात महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडत असतानाही त्यांनी आपल्या जन्मभूमीशी असलेले नाते कायम जपले आहे. कुंडलवाडी व परिसरातील नागरिकांना मुंबईत अथवा इतरत्र कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

उनके या पदोन्नतीबद्दल पत्रकार गणेश कत्रूरवार, अशोक हाके, हरीष देशपांडे, शंकर कोंडावार, प्रा.डॉ. बालाजी चिरडे, डॉ. नरेश बोधनकर, सूर्यकांत वगशेट्टे, गंगाधर रुद्रूरकर, सुरेश दुगमोड, अशोक अवधाने, अ‍ॅड. अजय कुलकर्णी यांच्यासह कुंडलवाडी शहर व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कुंडलवाडीच्या सुपुत्राने मुंबई पोलीस दलात मिळवलेले हे यश शहरासाठी अभिमानास्पद असून युवकांसाठी प्रेरणादायी आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

COMMENTS