कुंडलवाडी : आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक 112 वर वारंवार खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवि

कुंडलवाडी : आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक 112 वर वारंवार खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.11 वाजता साईनाथ लालबा पालाक्रुतीवार (वय 52, व्यवसाय – शेती, रा. नांदेड बेस, कुंडलवाडी) यांनी 112 या आपत्कालीन पोलीस मदत क्रमांकावर फोन करून कुंडलवाडी शहरातील बाजार लाईन परिसरात काहीजण मटका व जुगार खेळत असून स्वतःला मारहाण झाल्याची माहिती दिली. माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तपासणीदरम्यान तेथे मटका किंवा जुगार सुरू नसल्याचे तसेच कॉल करणार्या व्यक्तीला कोणतीही मारहाण झालेली नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संबंधित व्यक्तीला भविष्यात खोटे कॉल करू नयेत, अशी समज देण्यात आली. तथापि, समज दिल्यानंतरही संबंधिताने पुन्हा दोन वेळा 112 क्रमांकावर फोन करून खोटी माहिती दिल्याने पोलिसांची दिशाभूल झाली आणि आपत्कालीन यंत्रणेचा मौल्यवान वेळ वाया गेला. या प्रकरणी साईनाथ लालबा यांच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 65/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 217 व 212अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS