Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पंजाबी महिला ड्रग्ज डीलरला 15 वर्षांची शिक्षा

जालंधर : अमेरिकेत केटामाइन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा नावाच्या महिलेला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॉस

डाऊनफॉल नेमका कुणाचा ?
डिझेल नाही म्हणून रुग्णवाहिका नाकारली; वेळेत उपचार न मिळाल्याने निष्पाप बाळाचा पोटातच मृत्यू!
देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प; अनेक राज्यांमध्ये हॉटेल व्यवसाय सापडला संकटात


जालंधर : अमेरिकेत केटामाइन क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंजाबी वंशाच्या जसवीन संघा नावाच्या महिलेला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लॉस एंजेलिस फेडरल कोर्टच्या न्यायाधीश शेरिलिन पीस गार्नेट यांनी शिक्षा सुनावताना सांगितले की, संघाने उच्च-प्रोफाइल ग्राहकांना ड्रग्ज पुरवून आलिशान जीवन जगले. ’फ्रेंड्स’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूमध्ये तिचा थेट सहभाग होता. पेरीचा 2023 मध्ये केटामाइनच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. जसवीनने स्वतः कबूल केले होते की तिने पेरीला केटामाइन विकले होते. संघाच्या कुटुंबाचा संबंध जालंधरजवळील फिल्लौरशी आहे.

COMMENTS