Homeताज्या बातम्या

भोसलेंची अतूलनीय कामगिरी, 19 जनावरे सोडवली

नांदेड : जिल्ह्यात अवैध मार्गाने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार्‍यांवर आणि कत्तलीच्या उद्देशाने ती दडवून ठेवणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलस

उच्चशिक्षित बहीण-भावाची आत्महत्या
वकिलाच्या कारमधून 1.90 कोटीचे ‘मेफेड्रोन’ जप्त
नांदेड विधान परिषद मतदारसंघासाठी हालचालींना वेग; बदललेल्या राजकीय समीकरणांत रंगणार नवी लढत


नांदेड : जिल्ह्यात अवैध मार्गाने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार्‍यांवर आणि कत्तलीच्या उद्देशाने ती दडवून ठेवणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 19 गोवंशीय जनावरे आणि एक आयशर वाहन, असा एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतुकीला आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात ही अतुलनीय कामगिरी करण्यात आली. 26 जून 2026 रोजी एलसीबीचे पथक इतवारा उपविभागात पेट्रोलिंग करत असताना, गाडेगाव रोडवरील मल शुद्धीकरण केंद्रासमोर आणि इक्बालनगर पाण्याच्या टाकीजवळील एका शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने जनावरे आणली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने सकाळी पावणेनऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी आयशर टेम्पो (क्रमांक  एम  एच 26- बी इ -4946 मधून अवैध वाहतूक केले जाणारे 10 बैल जप्त करण्यात आले. तसेच मोहम्मद सादिक अब्दुल गफुर याच्या शेडमधून कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 8 बैल आणि 1 गाय, अशी 9 जनावरे जप्त करण्यात आली. याप्रप्रकरणी चालक झबीउल्लाखान झहीरउल्लाखान, व्यापारी शेख कलीम ऊर्फ कल्यु शेख अहमद, मोहम्मद सादिक अब्दुल गफुर आणि मोहम्मद रिजवान मोहम्मद जाफर यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार मोहन हाक्के यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी एलसीबीच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

COMMENTS