Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘गणेश’ परिसराच्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांचा उद्या भव्य नागरी सत्कार

कोपरगाव : विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवानेते आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बुधवार, दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ६ वा

संस्था मोठी होणे हे संस्थापकांच्या कष्टाचे चीज; आमदार आशुतोष काळे यांचे प्रतिपादन
तनपुरेंच्या प्रवेशामागे विकासाचे राजकारण की राजकारणाचा विकास? राहुरीच्या सत्तेच्या पटावर नवी समीकरणे
राहात्यात आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार

कोपरगाव : विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल युवानेते आमदार विवेक कोल्हे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बुधवार, दिनांक २७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राहाता येथील वीरभद्र महाराज मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे मित्र मंडळ व गणेश परिसराच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ऊस उत्पादक शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचाच जनहिताचा आणि संघर्षशील वारसा पुढे नेत आमदार विवेक कोल्हे यांनी अल्पावधीत सहकार, समाजकारण आणि युवक नेतृत्वाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी धडाडीने काम करणारे नेतृत्व म्हणून विवेक कोल्हे यांच्याकडे पाहिले जात आहे. गणेश कारखाना निवडणुकीत त्यांनी दाखवलेले प्रभावी नेतृत्व राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. त्यांच्या नेतृत्वाला आता विधान परिषदेच्या माध्यमातून अधिक बळ मिळाल्याने कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

या नागरी सत्कार सोहळ्यास राहाता तालुक्यासह गणेश परिसरातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS