Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बीड : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्

किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; भीम अनुयायांचा जनसागर
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नांदेडमध्ये अभिवादनाचा कार्यक्रम

बीड : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती तायडे डी. ओ. होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील ए. आय. उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर प्रा. गायकवाड आर. एन. यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची माहिती देत त्यांच्या शिक्षणासाठीच्या जिद्दीचे आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्य श्रीमती तायडे डी. ओ. यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. त्यांनी भारतीय संविधान निर्मितीत बाबासाहेबांनी बजावलेली ऐतिहासिक भूमिका सांगत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांनीही बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपले विचार मांडले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध वातावरण असून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पाटील पी. एन. यांनी केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.

COMMENTS