Homeताज्या बातम्यादेश

मनालीत कार दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू

शिमला : गुजरातमधील भावनगर येथून हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधी समाजातील एका कुटुंबाच्या वाहनाला मनालीजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. खोल

वांद्रे स्थानकाजवळील ‘गरिब नगर’ झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेची मोठी कारवाई; पुढील चार दिवस चालणार पाडकाम मोहीम
भिवंडीतील परसनाथ कंपाऊंडमधील कपड्यांच्या गोदामात भीषण आग; अग्निशमन दलाकडून रात्रभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही
अंधेरीतील संभाजी जयंती कार्यक्रमात भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण; कारवाईची मागणी.


शिमला : गुजरातमधील भावनगर येथून हिमाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलेल्या सिंधी समाजातील एका कुटुंबाच्या वाहनाला मनालीजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. खोल दरीत वाहन कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे भावनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ललितभाई फतनानी हे आपल्या कुटुंबीयांसह हिमाचल प्रदेशातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी गेले होते. सोमवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान हे सर्वजण मनालीहून बेला येथे जात असताना कांगडा जिल्ह्यातील छाबा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर त्यांचे वाहन अचानक नियंत्रणाबाहेर गेले आणि खोल दरीत कोसळले. वाहनात चालकासह दहा जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवून चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ललितभाई फतनानी, सोनियाबेन फतनानी, प्रियंकभाई भोपाणी, काजलबेन भोपाणी, दिव्यांशु भोपाणी तसेच चालक यशवंत कुमार यांचा मृत्यू झाला. तर मयंकभाई फतनानी, फोरमबेन फतनानी, जियांश फतनानी आणि प्रियांशी भोपाणी हे जखमी झाले आहेत. सिंधू सेनेचे प्रदेशाध्यक्ष कमलेश चंदाणी यांनी हिमाचल प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून मदतकार्य आणि उपचारांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी समन्वय साधला असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि निसरडे रस्ते यामुळे अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

COMMENTS