परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं परळीत आयोजन – खासदार प्रीतम मुंडे 

Homeताज्या बातम्या

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं परळीत आयोजन – खासदार प्रीतम मुंडे 

   बीड प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन देशभरात करण्यात आलंय. बीडच्या

मांजरेकरांचं टेन्शन वाढलं, नवा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात | LokNews24
जातनिहाय जनगणनेला अटींसह संघाचा पाठिंबा
गोवंशला राष्ट्रमातेचा घटनात्मक दर्जा द्यासकल हिंदू समाजाची मागणी; राष्ट्रपती,पंतप्रधान,राज्यपाल,व मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन

   बीड प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन देशभरात करण्यात आलंय. बीडच्या परळीत देखील परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला आहे. दरम्यान भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील विद्यार्थ्यांमध्ये बसून हा कार्यक्रम पाहिला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या स्क्रिन वरील कार्यक्रम हा बंद पडला त्यामुळे कोणताही खंड पडू न देता प्रीतम मुंडे यांनी आपला मोबाईल काढून विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम दाखवला आहे. परळीतील महिला महाविद्यालयात याचं आयोजन करण्यात आल होतं. पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचे साक्षीदार हे विद्यार्थी झाले आहेत.

COMMENTS