Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना

कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसर

आष्टीत उजळला मानवतेचा दीप; साध्या विवाहातून चार दिव्यांग निराधारांना जीवनाचा आधार
लाच घेताना महावितरणची महिला सहाय्यक अभियंता रंगेहात जेरबंद; एसीबीची आष्टीत धडक कारवाई
धानोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एच एस सी परीक्षेत मारली बाजी

कडा : आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून शेततळ्यात बुडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव रितेश दीपक वाघमारे (वय 18) असे आहे. तो आपल्या मित्रांसोबत गावाजवळील शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहून झाल्यानंतर काही मित्र परतल्यानंतर रितेश हा एका मित्रासोबत तिथेच थांबला होता. दरम्यान, कपडे धुत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल पाण्यात पडला. रितेशला पोहता येत नसल्यामुळे त्याला स्वतःचा जीव वाचवता आला नाही आणि तो पाण्यात बुडून मरण पावला. ही घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. या घटनेमुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पालकांनी लक्ष देण्याची गरज
गावाकडील शेततळे, तलाव किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी पोहण्यासाठी जाणार्‍या तरुणांबाबत पालकांनी विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अनेकदा मुलांना पोहता येत नसतानाही ते धाडस करतात आणि अशा दुर्घटना घडतात. पालकांनी आपल्या मुलांना पाण्याजवळ एकटे न पाठवणे, तसेच त्यांना पोहण्याचे योग्य प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे.

COMMENTS