Homeताज्या बातम्या

राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत बीडच्या मुलींना रौप्यपदक; शासनाच्या ५% क्रीडा आरक्षणाचा मिळणार लाभ

पुणे: बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या महाराष्ट्र राज्य रग्बी अजिंक्यपद स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या १९ व

नसरापूर अत्याचार आणि हत्या खटल्यात ६५ वर्षीय आरोपी दोषी; अंतिम शिक्षेचा निर्णय २९ जूनला
नांदेडच्या कायदा-सुव्यवस्थेची धुरा ’सिंघम’च्या हाती; गुन्हेगारांबरोबरच राजकीय दबावालाही द्यावी लागणार टक्कर!
अॅमेझॉनला महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जॅसी यांना आवाहन

पुणे: बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या महाराष्ट्र राज्य रग्बी अजिंक्यपद स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने रौप्यपदक पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे संघातील सर्व खेळाडूंना शासनाच्या नोकरी व शिक्षणातील ५% क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्पर्धेत रविवारी अत्यंत चुरशीचे अंतिम सामने रंगले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात बीडच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि दुसरे स्थान पटकावले. या उपविजेत्या संघात आदिती लोंढे, कीर्ती जाधव, राधा दिवे, दिपाली ताटे, श्रुती हांडगे, नंदिनी पवार, प्रतीक्षा जाधव, किरण गर्जे, श्रावणी काकडे, कोमल जाधव, सिमरन शेख, तृष्णा कोकाटे, सखु राठोड, दिव्या राठोड आणि अश्विनी कोळेकर यांचा समावेश होता. खेळाडूंना नितीन येळवे सर, अशोक चौरे सर, शोएब खाटीक (कारागृह पोलीस, बीड) तसेच महादेव नरवडे सर, प्रकाश शिंदे सर, सोनाली शिंदे मॅडम, केतन गायकवाड आणि प्रफुल हटवटे यांचे प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून विशेष सहकार्य लाभले.

या यशाबद्दल बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले, कार्याध्यक्ष नितीन येळवे यांच्यासह मोरया क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे भरभरून अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र रग्बी असोसिएशन आणि पुणे रग्बी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेसाठी व्हेनकोब, व्हेन्कीज आणि रॅम यांनी मुख्य प्रायोजकत्व केले होते. राज्यस्तरावर हे मानाचे पदक मिळाल्याने बीडच्या या ग्रामीण खेळाडूंचे शासकीय नोकरी व उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत.

COMMENTS