Homeताज्या बातम्या

स्वाक्षरीसाठी तीन हजारांची लाच; करखेलीतील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या सापळ्यात

नांदेड : शासकीय कागदपत्रांवरील स्वाक्षरीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभा

जिल्हा परिषद शाळेपासून AIIMS पर्यंत भरारी; नरसीच्या तपस्या पुलचवाडची NEET 2026 मध्ये देशात ११२० वी रँक
अजित डोभालांची लोकमान्य समजून घेण्यात झालेली चूक !
दिल्लीत भाजपचे पंजाब सरकारविरोधात तीव्र आंदोलन; पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; 'एसीबी'ने रंगेहाथ  पकडले Hingoli Marathi News | Hingoli: Sarpanch demanded bribe for subsidy  for a house; ACB caught him red-handed | Latest Hingoli News at Lokmat.com

नांदेड : शासकीय कागदपत्रांवरील स्वाक्षरीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. वार्षिक कार्यमूल्यांकन अहवालावर अभिप्राय नोंदवून स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. सोमेश नागोराव मोरे यांना एसीबीने जाळ्यात अडकविल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, धर्माबाद तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या २४ वर्षीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या वार्षिक कार्यमूल्यांकन अहवालावर स्वाक्षरी करून तो पुनर्विलोकनासाठी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी डॉ. मोरे यांनी सुरुवातीला चार हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याने १ ऑगस्ट रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी ३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर तीन हजार रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. सोमवारी करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने डॉ. मोरे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती एसीबीने दिली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक कैलास मगर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल यशवंत दावनबाड, राजेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गोरपल्ले आणि चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश मामुलवार यांचा सहभाग होता. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांचे पर्यवेक्षण लाभले, तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS