Homeताज्या बातम्या

डिग्रस फाटा येथे स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी; आमदार प्राजक्त तनपुरे यांचे मंजुरीचे आश्वासन

देवळाली प्रवरा: नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आमदार प्राजक्त तनपुर

सह्याद्री गेस्ट हाऊससह शासकीय बंगल्यांची कामे न करताच कोट्यवधींची बिले काढत भ्रष्टाचाराचा विक्रम; मलबार हिल पीडब्ल्यूडी विभागातील मोठे रॅकेट उघड
सुरतहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सला पुराचा वेढा; परळीतील दोघांसह ४० प्रवासी टपावर, ड्रायव्हर पळाला!
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; विष्णुपंत रसाळ सरांचा सामाजिक उपक्रम

देवळाली प्रवरा: नगर-मनमाड महामार्गावरील डिग्रस फाटा येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या सकारात्मक पाठपुराव्यानंतर डिग्रस फाट्यावर लवकरच स्पीड ब्रेकरला मंजुरी मिळवून देण्याचे ठोस आश्वासन आमदारांनी दिले आहे.

डिग्रस फाटा येथे अपघातांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यातही अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय सरपंच रावसाहेब पवार यांनी थेट महामार्गाच्या ठेकेदारांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी डिग्रस फाट्यासह वांबोरी फाटा, विद्यापीठ परिसर आणि राहुरी पाण्याची टाकी या महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, सिग्नल यंत्रणा व डिव्हायडर उभारण्यासाठी संबंधित विभागाला तात्काळ सूचना देण्याचे आश्वासन दिले. या वेळी सरपंच रावसाहेब पवार, जालिंदर बेल्हेकर, केशव बेल्हेकर, जे. के. पवार, काका गावडे, उमेश पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सततच्या अपघातांचा प्रश्न धसास लावल्यानंतर अखेर येथे स्पीड ब्रेकरला मंजुरी मिळण्याचे आश्वासन मिळाल्याने डिग्रस फाटा व परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS