चिंताजनक वित्तीय तूट !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

चिंताजनक वित्तीय तूट !

भारताच्या अर्थव्यवस्थेत चालू तिमाहीची आकडेवारी अतिशय चिंताजनक आली असून देशाच्या वित्तीय विभागाला यामुळे अधिक चिंतीत व्हावे लागले आहे. नुकत्याच संपलेल

रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…
गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात.
धक्कादायक! 17 वर्षांची आई, 12 वर्षाचा बाप | LOK News 24

भारताच्या अर्थव्यवस्थेत चालू तिमाहीची आकडेवारी अतिशय चिंताजनक आली असून देशाच्या वित्तीय विभागाला यामुळे अधिक चिंतीत व्हावे लागले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाही चा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून गेल्या तिमाही पेक्षा वर्तमान तिमाहीची तूट जवळपास ९ बिलियन कोटींची असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २२.१ बिलियन व्यापारातील असणारी आकडेवारी चौथ्या तिमाहीत हेच आकडे १३.४ बिलियन आल्याने व्यावसायिक तूट प्रचंड मोठी आली. निर्यातीपेक्षा आयातीत वाढ झाल्याने ही तूट मोठ्या प्रमाणात दिसते आहे. यावर केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँकेने चिंता व्यक्त करून जवळच्या काळात जागतिक मंदी येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तेलाच्या पडलेल्या किमती, हे देखील जागतिक मंदीचं एक लक्षण मानलं जात आहे.  सध्या या तुटीमुळे चिंतेत भर पडली आहे. जून मध्ये ही तूट भरून काढण्यासाठी सरकारच्या पातळीवर मोठे प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले परंतु प्रत्यक्षात व्यवहारातील तूट मात्र ही सात टक्क्यांपेक्षा अधिक राहिली. सोनी आयात देखील या काळात वाढल्यामुळे या चिंतेत भर पडली आहे त्यामुळे सोन्याच्या आयातीवर काही प्रमाणात कर लादले जातील अशी, संभावना निर्माण झाली आहे. जवळच्या काळात सोन्याच्या आयातीवर निर्बंध लादले जातील, याची संभावना ही यामुळे दिसून येते आहे. अर्थात कोरोना काळामध्ये देशांतर्गत विवाह करण्यावर बऱ्याच मर्यादा आल्यामुळे, सोन्याच्या एकूण खरेदीतही घट झाली होती. परंतु, आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्यामुळे लग्न समारंभाचे प्रमाण देखील वाढल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ होत आहे. त्याच अनुषंगाने सोने आयातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. देशातील एकूण जीडीपी ही तीन टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता अर्थसंकल्पीय हिशोबानुसार गृहीत धरली होती. परंतु, प्रत्यक्षामध्ये केवळ १.२ टक्के जीडीपीत वाढ झाली त्यामुळे ही बाब देखील या आर्थिक तुटीसाठी चिंताजनक म्हटली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर या स्थितीचा एक मोठा दबाव निर्माण झाला आहे; कारण याचमुळे रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात घसरले आहे. चौथ्या तिमाहीत केलेल्या वित्तीय पाहणीत रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत सहा टक्क्यांनी आणखी पडले आहे किंवा कमी झाले आहे. जागतिक पातळीवर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याचाही हा अविभाज्य परिणाम असेल, असेही यासंदर्भात म्हटले जात असले तरी एकूणच जीडीपी मधील घट, प्रत्यक्षात वाढलेली आयात, घटलेली निर्यात आणि त्यामुळे बिघडलेले व्यापार संतुलन या सगळ्याच बाबींचा एक सामायिक परिणाम म्हणून सध्याच्या आर्थिक तुटीत दिसत आहेत. अर्थात, आयात निर्यातीचे परिणाम काही जरी असले तरी देशांतर्गत जो ग्राहक आहे त्याची घटलेली क्रय शक्ती देखील या सगळ्या बाबींना कारण ठरते आहे. देशाच्या व्यापार संतुलनात निर्यात वापर वाढल्याशिवाय त्या देशाच्या जीडीपीत खऱ्या अर्थाने वाढ होत नाही. निर्यातीशिवाय जीडीपीत होणारी वाढ ही एक प्रकारची सूज असते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. देशांतर्गत आलेल्या या वित्तीय तुटीचा एक अर्थ असाही लावला जात आहे की, रशिया – युक्रेन युद्धामध्ये जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची परिस्थिती निर्माण होत आहे किंवा झाली आहे, त्याचाही या वित्तीय तूटीवर एक परिणाम झाल्याचे अर्थतज्ञ म्हणत आहेत. सध्या रुपयात झालेली घसरण ही देखील अमेरिकन डॉलरच्या तुलनेत फार मोठी आहे आजच्या दिवसाला एका डॉलरला ७९.९९ एवढ्या रुपयाची मूल्य दडलेली आहे डॉलरच्या किमतीत रुपयाचे मूल्य जवळपास १९% पर्यंत घसरलेले आहे. विकी बाजारपेठेतील तज्ञ रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ८१ रुपयापर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली आहे त्यामुळे एकंदरीतच देशात निर्माण झालेल्या वित्तीय तुटीवर आर्थिक क्षेत्रामध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS