Homeताज्या बातम्या

मुंबईत मुसळधार पाऊस, तरीही टप्पा वाढीसाठी विनाअनुदानित शिक्षकांचा एल्गार कायम; आझाद मैदानावर तिसऱ्या दिवशीही ठिय्या

मुंबई: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असतानाही आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानाव

गजानन विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगासनांद्वारे निरोगी आयुष्याचा दिला संदेश
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी)नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
गेवराई पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ७.५० लाखांचा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त

मुंबई: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला असतानाही आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन तिसर्‍या दिवशीही जोमाने सुरू राहिले आहे. पावसाची पर्वा न करता राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले हजारो शिक्षक बंधू-भगिनी मैदानात ठामपणे उभे राहिले असून, मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनाची तीव्रता आणि शिक्षकांचा वाढता सहभाग लक्षात घेता, शिक्षक समन्वय संघाच्या प्रमुख शिष्टमंडळाने बुधवार (दि. २३) रोजी विधानभवनात राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळाने मांडलेल्या प्रत्येक मागणीची शिक्षणमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. बैठकीदरम्यान, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

मात्र, केवळ आश्वासनांवर शिक्षक समाधानी नसून चालू अधिवेशनातच मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन शासनाने अधिकृत घोषणा करावी, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली आहे. चर्चा आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे, असे शिक्षक नेत्यांनी ठामपणे सांगितले.

आंदोलन निर्णायक वळणावर

शिक्षक समन्वय संघाने आंदोलनाला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, आपली एकजूट आणि आझाद मैदानावरील वाढती उपस्थितीच न्याय मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. आंदोलनाची पुढील दिशा, तीव्रता आणि संभाव्य कृती आराखडा याबाबतचा अंतिम निर्णय आज गुरुवार दिनांक २५ रोजी घेण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. या महत्त्वपूर्ण बैठकीत शिक्षक समन्वय संघाचे खंडेराव जगदाळे, संजय रंगारी, अजय थुल, वैद्यनाथ चाटे, भानुदास लहाने, पुंडलिक रहाटे, संजय डावरे आणि भारत जामनिक यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी सुरू असलेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, शासनाची पुढील भूमिका आणि समन्वय संघाचा उद्याचा निर्णय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS